HW News Marathi
देश / विदेश

अरुण जेटली यांची प्रकृती अजूनही गंभीर

नवी दिल्ली | माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते अरुण जेटली यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. जेटली यांना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आठवड्याभऱ्यापासून जेटलींवर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल (१६ ऑगस्ट ) एम्समध्ये जेटलींच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गेले होते. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुन्हा एम्समध्ये जेटलींच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी दाखल झाले. जेटली यांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर एम्सकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही

जेटली यांना शुक्रवारी (९ ऑगस्ट) श्वसनास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल केले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रुग्णालयात जाऊन जेटली यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

अरुण जेटली यांनी मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात अर्थमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. परंतु बऱ्याचवेळा प्रकृती ठीक नसल्याने त्यांचे कामकाज पियुष गोयल यांनी पाहिले. जेटली कर्करोगावर उपचार करण्यासाठी परदेशात गेले होते. यावर उपचार करून पुन्हा मायदेश परतले होते. मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळात समावेश करण्यात येऊ नये असे त्यांनी पत्र लिहून कळवले होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

त्यांच्यात भगवान श्रीकृष्णाची चतुरता आहे – मंगलप्रभात लोढा

News Desk

अल कायदाच्या म्होरक्याची कश्मीरवर आत्मघाती हल्ला करण्याची धमकी

News Desk

राहुल गांधींनी दिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अशा शुभेच्छा

News Desk