HW News Marathi
महाराष्ट्र

भिवंडी इमारत दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांना दु:ख

मुंबई | भिवंडीच्या पटेल कंपाऊंडमधील जिलानी अपार्टमेंट इमारत आज सकाळी कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान दुर्घटनेत जखमी नागरिकांना वैद्यकीय उपचार उपलब्ध करण्यात आले असून ते लवकर बरे होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

दुर्घटनास्थळी बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरु असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची सुखरुप सुटका करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे बचाव व मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत. बचाव कार्यात गुंतलेल्या शासकीय अधिकारी, महापालिकेचे अधिकारी, पोलिस, अग्निशमन दल, एनडीआरएफ जवानांच्या प्रयत्नाने सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळेल असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रामकथा हे आमचे राष्ट्रीय चारित्र्य! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

अहमदनगर हत्याकांडाची केस फासट्रॅक कोर्टात चालवा

News Desk

कंगणाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख!

News Desk