HW News Marathi
महाराष्ट्र

कृषी विधेयकाला विरोध करणारे हेच ते दहशतवादी!

मुंबई | मुंबई पोलीस, मुंबईविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारी ही अभिनेत्री कंगना राणावतवने शिवसेना आणि मुंबई महानगरपालिकेवर केलेल्या टीकेनंतर वाद वाढतच चालला आहे.आता पुन्हा एकदा कंगनाने एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. कृषी विधेयकाच्या मुद्द्यावरुन केंद्रातील सरकारविरुद्ध शेतकरी असे चित्र दिसत आहे. यासाठीच्या आंदोलनांनाही गंभीर वळण प्राप्त होऊ लागलं आहे. असं असतानाच कंगनानं या आंदोलकांची तुलना दहशतवाद्यांशी करत एका नव्या वादाला तोंड फोडले आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, जो झोपी गेला आहे त्याला जागवता येऊ शकतं. ज्याला गैरसमज आहेत ते दूरही करता येऊ शकतात, त्यांची समजूत काढता येऊ शकते. पण, झोपण्याचं आणि काहीही न समजल्याचा अभिनय कोणी करत असेल तर तसं सोंग कोणी घेत असेल त्यांना समजावण्यामुळं काय फरक पडणार आहे? CAA ला विरोध करणारे हे तेच दहशतवादी आहेत. CAA विरोधातील आंदोलनात रक्ताचे पाट वाहिले. पण, या कायद्यामुळं एकाही व्यक्तीचं नागरिकत्व हिरावलं गेले नाही’, असं कंगनानं तिच्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1307640690868805635?s=20

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका ट्विटचा आधार घेत कंगनानं तिची भूमिका स्पष्ट केली. कृषी विधेयकानंतर मोदींनी शेतकऱ्यांना उद्देशून एक ट्विट केलं. ज्यामध्ये त्यांनी आपलं सकरार हे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर असल्याची बाब स्पष्ट केली. ‘मी यापूर्वीही सांगितलं आहे आणि आता पुन्हा सांगत आहे. एमएसपीची व्यवस्था यापुढेही सुरु राहिल. शेतमालाची खरेदी सरकार करणार आहे. आम्ही इथं शेतकऱ्यांच्या सेवेसाठीच आहोत. अन्नदाता असणाऱ्या बळीराज्याच्या सेवेसाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करणार आहोत आणि त्यांच्या भावी पिढीसाठी समृद्ध जीवनाची शाश्वतीही देणार आहोत’, असे मोदी म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रामाचं नाव घ्यायचं कृती नथुरामाची करायची ही भाजपाची पध्दत पुन्हा एकदा पुढे आली

News Desk

आम्ही आजपर्यंत कधीही पवारसाहेबांना इतके चिडलेले पाहिले नव्हते !

News Desk

कोर्टाच्या निकालावर राजकीय प्रतिक्रिया देणं योग्य नाही – संजय राऊत

News Desk