HW News Marathi
महाराष्ट्र

#Coronavirus : ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनच्या निकषांमध्ये बदल – राजेश टोपे

मुंबई | राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भाववर आळा घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार आरोग्य यंत्रणेच्या साहाय्याने अथक प्रयत्न करत आहेत. दरम्यान, राज्यातील जिल्ह्यांचे ग्रीन, रेड, ऑरेंज असे झोन तयार करण्यात आले होते. त्यात आता काही अंशी बदल करण्यात आला आहे.

१४ दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण आढळला नाही तर तो जिल्हा ऑरेंज झोन म्हणून घोषित करण्यात येईल. तर, २८ दिवस एकही कोरोनाबाधित आढळला नाही तर तो जिल्हा ग्रीन झोन घोषित करण्यात येईल. आणि ज्या जिल्ह्यात १५ पेक्षा जास्त कोरोनाबाधित आहेत तो रेड झोन असेल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान, या झोनचा जुना निकष हा १५ पेक्षा कमी रुग्ण असल्यास तो जिल्हा ऑरेंज झोन होता आणि ग्रीन झोन म्हणजे कोरोनाबाधित एकही रुग्ण नसणे. पण, या निकषांमध्ये काही बदल केल्याची माहिती राजेश टोपे यांनी काल (२० एप्रिल) दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या…ST कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात कशी झाली वाढ?

News Desk

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्रेनिंग घ्यावं

News Desk

शासकीय योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे काम महत्त्वपूर्ण – आदिती तटकरे

Aprna