HW News Marathi
देश / विदेश

मोदी सुद्धा उपोषणाला बसणार

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी १२ एप्रिल रोजी एकदिवसीय उपोषणाला बसणार आहेत. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी गोंधळ घालून वाया घालवले, याच्या निशेदार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा एकदिवसीय उपोषण करणार आहेत.

नरेंद्र मोदी हे दिल्लीत तर अमित शहा कर्नाटकातील हुबळी येथे उपोषणाला बसणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. मोदींच्या या उपोषणाचा परिणाम सरकारी कामकाजावर होणार नसल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. मोदींना पाठिंबा देण्यासाठी भाजपचे खासदारही एकदिवसीय उपोषण करणार आहेत.

राहुल गांधींचे उपोषण

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोन दिवसापूर्वी एकदिवसीय उपोषणाला बसले होते. गांधी यांनी दलितांवरील अत्याचाराच्या निषेदार्थ एक दिवसीय उपोषण केले होते. काँग्रेसच्या नेते मंडळीं उपोषणाला बसण्याआधी छोले भटूरेवर ताव मारतानाचा फोटो सोशल मीडीयावर व्हायरल झाला होता. तर गांधी यांनी ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा उशीराने उपोषणा सुरु झाले.

या कारणांमुळे राहुल गांधी यांचे उपोषण चर्चेचा विषय ठरले होते. तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उपोषण कोणत्या कारणामुळे चर्चेचा होईल. याकडे सर्व विरोधी पक्षांचे लक्ष लागेल आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस कार्यकर्त्यांचे प्रताप, शहीदांच्या श्रद्धांजली सभेत नेत्यावर उधळले पैसे

News Desk

उर्जित पटेल गव्हर्नरपदाचा राजीनामा देणार ?

Gauri Tilekar

#PulwamaAttack : दहशतवाद्यांनी आपले तळ पाकिस्तानी लष्कराच्या जवळ नेले

News Desk