राज्यातल्या महामार्गाची लांबी गेल्या चार वर्षात चौपटीने वाढली आहे. चार वर्षापूर्वी २०१४ साली राज्यात ५७०० किलो मीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते ते २०१७-१८ मध्ये २२,४३६ किलो मीटर इतके लांब झाले. हे केंद्रीयबांधकाम मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या टीमचे यश आहे असे वक्तव्य र्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ॲण्ड हायवेजच्या वतीने सोमवारी उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी- कर्मचारी आणि अभियंत्यांचा सत्कार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. याकार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिेंदे, राज्यमंत्री मदन येरावार, प्रधान सचिव अशिष सिंह, रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यासह केंद्र तसेच राज्यातील इतरवरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
आपल्या हातून राज्य आणि राष्ट्र निर्माणाचे उत्तम काम व्हावे ही अपेक्षा व्यक्त करून मुनगंटीवार यांनी गौरव झालेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीयांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील रस्त्यांचा विकास झपाट्याने होत आहे. एकूण तरतूदीच्या ४५ टक्के रक्कमेची कामे महाराष्ट्रात होत आहेत. सावित्री नदीवरचा पूल १६५ दिवसांच्या रेकॉर्ड टाईममध्ये बांधून वाहतूकीसाठीखुला करण्यात आला. मुंबई- गोवा महामार्गाच्या कामाला गती देण्यात आली आहे. मंत्री उत्तम आहेतच परंतू त्यांना साथ देणारी टीम उत्तम असेल तर विकासाच्या कामात कोणतेही अडथळे येत नाहीत. आज काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव झाला आहे. भविष्यात महाराष्ट्रातील सर्व अधिकाऱ्यांना अशी प्रमाणपत्रे मिळतील यादृष्टीने उत्तम काम व्हावे ही अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.