HW News Marathi
देश / विदेश

#ITraidsHWNews | HW च्या ऑफिसवर Income Tax ची धाड

टीम एच.डब्ल्यू. न्यूज | एच.डब्ल्यू. न्यूज नेटवर्कच्या ऑफिसमध्ये बुधवारी (१६ सप्टेंबर) आयकर विभाग Income Tax Department ने छापा टाकला. गेले तब्बल ३ दिवस ही आयकर विभागाची रेड चालली. या ५० तासांहूनही अधिक काळात आमच्या ऑफिसमधील कर्मचारी आणि पत्रकारांच्या हालचालींवर अनेक निर्बंध होते. आमचे फोन्स जप्त करण्यात आले होते.

गेल्या या ३ दिवसांत आमचे अनेक कर्मचारी रात्रंदिवस ऑफिसमध्येच होते. या दिवसांत आम्हाला कोणत्याही प्रकारे कोणाशीही संपर्क साधण्यास परवानगी नव्हती, आमचे फोन्स-लॅपटॉप्स वापरण्यास परवानगी नव्हती. मात्र, या काळात आम्ही IT अधिकाऱ्यांच्या तपासाला पूर्णपणे सहकार्य केले आहे. निश्चितच या दिवसांत शारीरिकदृष्ट्या आम्हाला थकवा आला आहे. मात्र, आमचा निर्धार आजही कायम आहे.

तुमचा विश्वास हाच आमचा आधार आहे. आणि आम्ही आजही आमच्या विचारांवर पूर्णपणे ठाम आहोत. मात्र, आमच्या ऑफिसवर आयकर विभागाने (Income Tax Department) ही धाड का टाकली ? या गेल्या दिवसांमध्ये नेमकं काय काय घडलं ? मुळात हे सगळं का घडलं ? याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आम्ही उद्या (१८ सप्टेंबर) आपल्यासमोर मांडू.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेट बैठकीत एनपीआर अपडेटला मंजुरी

News Desk

निर्मला सीतारमण यांच्याकडून राष्ट्रपतींकडे बजेटची प्रत सुपूर्द

News Desk

मी शिवरायांचा अपमान केला नाही, उलट…! व्यंकय्या नायडूंची पहिली प्रतिक्रिया

News Desk