HW News Marathi
मुंबई

नाशिकमध्ये मनसेने आपला बालेकिल्ला राखून ठेवला

मुंबई | नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 (क) च्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बाजी मारली आहे. प्रतिष्ठेच्या लढाईत मनसेच्या वैशाली भोसले यांचा विजय झाला आहे. प्रभाग क्रमांक 13 (क) च्या पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी (6 एप्रिल) रोजी मतदान झालं होतं.

तर आज निकाल जाहीर करण्यात आला. मनसेच्या नगरसेविका सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. त्यासाठी ही पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीसाठी मनसेने भोसले यांच्या घरातच वैशाली भोसले यांना उमेदवारी दिली. तर शिवसेनेने मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या स्नेहल चव्हाण आणि भाजपने विजया लोणारी यांना उमेदवारी तिकीट दिलं आहे.

महत्त्वाचं म्हणजे या पोटनिवडणुकीत मनसेच्या उमेदवाराला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवसेना, मनसे आणि भाजप या प्रमुख पक्षामध्ये तिरंगी लढत झाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चार रुपड्यासाठी इमान विकू नका: राज ठाकरेंचे प्रशासनाला खरमरीत पत्र

swarit

पनवेल महापालिकेच्या आशिर्वादाने रहिवाशी त्रस्त

News Desk

विसर्जन मिरवणुकी दरम्यान एकाचा मृत्यू

Gauri Tilekar