HW News Marathi
देश / विदेश

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला वेटलिफ्टिंगमध्ये कांस्य पदक

सीडनी | कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला कांस्य पदक मिळाले आहे. पुरुषांच्या वेटलिफ्टिंगमध्ये १८ वर्षीय दीपक लाथरने ६९ किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले. दीपकने स्नॅचमध्ये १३५ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १५९ किलो असे मिळून २९५ किलो वजन उचलल्यानंतर कांस्य पदकास गवसणी घातली.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये वेटलिफ्टिंगमध्ये भारताचे हे चौथे पदक आहे. पहिल्या दिवशी मीराबाई चानूने सुवर्ण पदक, गुरु राजाने रौप्य पदक, संजिता चानू सुवर्ण पदक आणि दीपक लाथरने कांस्य पदक या चारही जणांनी पदक मिळवून कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताची मान उंचावली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशासाठी आरक्षणाला स्थगिती

News Desk

“राजीव सातव यांचा ‘तो’ मेसेज माझ्यासाठी ठरला शेवटचा”, काँग्रेस नेता झाला भावूक

News Desk

MPSCच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय

News Desk
राजकारण

पोलिसांनी पुरेशी सुरक्षा व्यवस्था न पुरविल्यामुळे हे घडले !

News Desk

मुंबई | “माझ्या वाढत्या लोकप्रियतेमुळे माझा दुःस्वास करणा-यांनी माझ्यावर हा हल्ला केल्याची शक्यता आहे. पोलिसांनी पुरेशी सुरक्षा व्यवस्था न पुरविल्यामुळे हा प्रकार घडला आहे,” असा आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. दरम्यान या संदर्भात मुख्यमंत्रयांची भेट घेणार असल्याचे आठवले यांनी सांगितले असून आपल्या समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. रामदास आठवले यांच्यावर शनिवारी (८ डिसेंबर) रात्री अंबरनाथ येथील एका कार्यक्रमात एका तरुणाने हल्ला केला. या संपूर्ण प्रकाराबाबत रामदास आठवले यांनी पोलिसांवर आरोप केले आहेत.

रामदास आठवले हे शनिवारी संविधान गौरव दिनानिमित्त अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमात हजर राहिले होते. रात्री १० च्या सुमारास हा कार्यक्रम संपल्यानंतर आठवले मंचावरून खाली उतरत असताना एका तरुणाने त्यांच्या अंगावर धावून येत त्यांच्या कानशिलात लगावली. या तरुणाचे नाव प्रविण गोसावी असे असून रामदास आठवलेंच्या समर्थकांनी या तरुणाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. या मारहाणीत हा तरुण गंभीर जखमी झाला असून उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

मराठा आरक्षणाबाबत रामदास आठवले यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून या तरुणाने रामदास आठवलेंवर हल्ला केला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. हा तरुण त्याच्या सोशल मीडियावर देखील आठवलेंच्या विरोधात बरेच लिहीत होता अशी देखील माहिती मिळत आहे. आठवले यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर आज अंबरनाथमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

Related posts

२०१९ अखेर पुण्यात मेट्रो धावणार !

News Desk

वनखात्याला अवनी वाघिणीला ठार मारण्याची हौस नव्हती !

Gauri Tilekar

लोकांची मने नुसती ओळखू नका; तर ती जिंकायलासुद्धा हवीत | बाळा नांदगावकर

News Desk