मुंबई | देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमटेडची आज (१२ ऑगस्ट) ४२व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत केली. या सभेत रिलायन्सकडून ग्राहकांना आकर्षत करण्यासाठी अनेक मोठ्य योजनांची घोषणा केली आहे. ‘जिओ फायबर वेलकम प्लान’मध्ये एका वर्षाच्या कालावधीसाठी जिओ फायबर सेवा घेणाऱ्यांना मोफत 4K LED टीव्ही आणि 4K सेट टॉप बॉक्स देण्यात येणार आहे.
RIL Chairman and Managing Director, Mukesh Ambani: Jio Fibre tariff plan to start from Rs 700 per month. https://t.co/wyNUVS7lqe
— ANI (@ANI) August 12, 2019
ही एक ब्रॉडबॅण्ड सेवा असून यामध्ये फायबर टू द होम (FTTH) च्या माध्यमातून थेट घरापर्यंत फायबर कनेक्शन येते. आतापर्यंतच्या इतर ब्रॉडबॅण्ड सेवांमध्ये फायबर कनेक्शन बिल्डिंगपर्यंत आणले जाते आणि तिथून घरापर्यंत केबलने कनेक्टिविटी पोहोचवली जाते. आता ५ सप्टेंबरपासून ही सेवा सर्वांसाठी खुली होणार असल्याचे मुकेश अंबानी यांनी बैठकीत सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.