HW News Marathi
Uncategorized

गिरीश महाजनांनी सेल्फी घेतला नाही ,मुख्यमंत्र्याचं स्पष्टिकरणं

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा एक सेल्फी व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर गिरीश महाजन आणि सरकार असंवेदनशील असल्याची टीका विरोधकांनी केली होती. या व्हिडिओमध्ये बोटीमधून पुरपरीस्थितीची पहाणी करायला गेलेले महाजन हसत हात हलवताना दिसत होते .

गिरीश महाजनांनी पूरग्रस्त भागात कोणताही सेल्फी घेतला नाही, असे स्पष्टिकरण आज मुख्यमंत्र्यांनी सांगली येथील पत्रकार परिषदेत दिलं आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांनासुद्धा चांगलेच सुनावलं आहे. आज मुख्यमंत्र्यांनी सांगलीमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते..

कोल्हापूर आणि सांगलीत यावर्षी २००५ पेक्षा जास्ती पाऊस झाला. पूरस्थिती इतकी भीषण होती की तिथे जाणे कुणालाही शक्य नव्हते. अशाही परिस्थितीत गिरीश महाजन त्या ठिकाणी गेले. त्यांनी पूरग्रस्तांची भेट घेतली आणइ त्यांना दिलासा दिला. त्यांनी कोणताही सेल्फी घेतला नाही. बोटीमधून सोडायला येणाऱ्यांना त्यांनी हात दिला होता. ते फुटेज एडिट करुन गैरवापर करण्यात आला असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे आणि विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार प्रकरणी शाळेच्या विश्वस्ताला अटक

News Desk

देशात गेल्या २४ तासात ९१९ नवे रुग्ण, ३१ जणांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू | केंद्रीय आरोग्य मंत्रालय

News Desk

भाजपमध्ये बॅचलर लोकांना भवितव्य

News Desk