HW News Marathi
राजकारण

चंद्राबाबू नायडू यांनी घेतली शरद पवारांची भेट

नवी दिल्ली | आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न मिळाल्यामुळे आघाडी सरकारमधून चंद्राबाबू नायडू बाहेर पडले आहेत. तेलुगू देसम पार्टी(टीडीपी)चे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मंगळवारी संसदेत भेट घेतली. चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएतून सुद्धा बाहेर पडले आहेत. तसेच शरद पवार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

गेल्या आठवड्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली. या दोघांच्या भेटीमुळे भाजपच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी १९ विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली होती. त्यामुळे २०१९पर्यंत भाजपविरोधी महाआघाडी स्थापन करण्यासाठी सर्व विरोधक एकत्र येत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तलवारीची धार कायम आहे व शिवसेनेची तलवार ‘म्यानबंद’ नाही !

News Desk

जोपर्यंत प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत मी आंदोलन करणारच – नारायण राणे

News Desk

‘गद्दारी’ करणारे पक्ष सोडून गेल्यामुळे काँग्रेसकडून ‘लाडू वाटप’

News Desk