नाशिक | तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे नागरिकांच्या मृत्यूच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. देशात प्रौढ व्यक्तींमध्ये तंबाखू खाणाऱ्यांचे व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण अधिक आहे. त्याचबरोबर लहान मुलांमध्ये सुद्धा तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचे लोण पोहोचले आहे. त्यामुळे कर्करोग फोफावत असून, यावर मात करण्यासाठी ‘जॉइन द चेंज’ या चळवळीची सुरुवात झाली आहे. नाशिक मधील २९ मार्च रोजी एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर येथील या जॉइन द चेंज या जनजागृती अभियानाचा प्रारंभ झाला.
‘नाशिक शहराचे सौंदर्य व आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी अनेक व्यक्ती, संस्था यात सहभागी झाल्या असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रबोधनात्मक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन’ नाशिक पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी केले.
पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या कल्पनेतून, एचसीजी मानवता हॉस्पिटलच्या सहकार्यातून व विविध संथांच्या पुढाकाराने ‘जॉइन द चेंज’ तंबाखूमुक्त नाशिक या जनजागृती अभियानाचा प्रारंभ करण्यात आला आहे. ‘जॉइन द चेंज’ अभियानाच्या बोधचिन्हाचे व फेसबुक पेजचे अनावरण या वेळी करण्यात आले. सिंगल म्हणाले, की भारतात तंबाखूविरोधात २००३ मध्ये कायदा तयार करण्यात आला आहे.
तरी त्या संदर्भात जाणीव, तसेच जागरूकता समाजात निर्माण झाली नाही. कारण कायद्याची कठोर अंमलबजावणी होत नाही. तंबाखूच्या निर्मूलनासाठी सामाजिक समर्थनाची नितांत गरज आहे. निव्वळ कायदे करून प्रश्न सुटणार नाही, तर समाजातील घटकाने याची जाणीव ठेवून दुसऱ्यांनाही त्याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. ज्या तंबाखूजुन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आहे, त्यावर पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.