HW News Marathi
महाराष्ट्र

धारावीत आज १५ नवे रुग्ण, एकूण कोरोनाबाधितांची संख्या १०० पार

मुंबई | महाराष्ट्रातील मुंबई धारावीमध्ये आज (१७ एप्रिल) १५ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. यामुळे आता धारावतील कोरोना बाधितांची संख्या १०१ वर पोहोचली आहे. तसेच माटुंगा लेबर कँम्पमध्ये पहिल्यांदा ४ रुग्ण आढळून आले असून त्यापैंकी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. आज मुंबईत करोनाबाधीत नवीन रुग्णांची संख्या आणखी घटली असून आज दिवसभरात ७७ नवीन रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू आहे. तर मुंबईतील कोरोना रुग्णांची एकूण रुग्णसंख्या २१२० वर पोहोचली आहे.

धारावती काल (१६ एप्रिल) २६ कोरोना रुग्ण सापडले होते आणि त्यात एकाचा मृत्यू झाला होता. त्यापैंकी माटुंगा लेबर कँम्प येथे एका ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. आज सापडलेल्या १५ रुग्णांमध्ये तीन महिलांचा समावेश असून हे रुग्ण मुस्लिम नगरमध्ये, माटुंगा लेबर कँम्प, इंदिरा नगरमध्ये प्रत्येकी तीन रुग्ण सापडले आहेत. तर धारावतील सोशल नगरमध्ये दोन आणि लक्ष्मी चाळ, जनता सोसायटी, सूर्योदय सोसायटीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.

तसेच धारावीमधील एका करोना रुग्णाचा सायन रुग्णालयामध्ये मृत्यू झाला आहे. आज १५ नवे रुग्ण सापडल्याने धारावीतील बाधितांची संख्या १०१ आणि मृतांची संख्या १० झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कामगारांची वस्ती असलेल्या माटुंगा लेबर कँम्पमध्ये पहिल्यांदाच तीन करोनाबाधित सापडल्याने सध्या परिसरात भीतीचे वातावरण आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्री संजय राठोडांवर कारवाई करा ! चित्रा वाघ यांचे पोलीस महासंचालकांना निवेदन

News Desk

“मोदींची भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो असा गैरसमज राज्य सरकारनं करून घेऊ नये” – विनोद पाटील

News Desk

“रायगडावर लायटिंग केली, हे उत्साही लोकांमुळे घडतंय”, रायगडावर केलेल्या लायटिंगवरुन उपमुख्यमंत्र्यांचीही नाराजी

News Desk