HW News Marathi
देश / विदेश

धोका टळला | चीनचे स्पेस स्टेशन पॅसिफिक महासागरात कोसळले

बीजिंग | अंतराळात भरटकत असलेले चीनचे स्पेस स्टेशन ‘टीयाँगाँग-१’ अखेर पॅसिफिक महासागरात कोसळले आहे. हे स्पेस स्टेशन मुंबईसह महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बंगालचा उपसागर भारतातील या भागात कोसळण्याची भिती व्यक्त करण्यात आली होती.

पण, हे स्पेस स्टेशन पॅसिफिक महासागरात कोसळल्यामुळे सुटकेचा निश्वास सोडण्यात आला आहे. अंतराळातून पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर या स्पेस स्टेशन जळून खाक झाले असून त्यांचे तुकडे पॅसिफिक महासागरात पडल्याची माहिती मिळाली आहे. टीयाँगाँग-१ असे नाव असून बसच्या आकाराचे होते.

चीनने २९ संप्टेंबर २०११ रोजी टीयाँगाँग-१ हे स्पेस स्टेशन लाँच करण्यात आले होते. पण, २०१६ मध्ये स्पेश स्टेशनशी चीनचा संपर्क तुटला. तेव्हापासून स्पेस स्टेशन अंतराळात कोणत्याही नियंत्रणाशिवाय फिरत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंटरपोलचे प्रमुख मेंग हाँगवेई बेपत्ता

swarit

फटाके फोडणे आणि मारणे ही भारतीय संस्कृती नाही – प्रकाश जावडेकर

News Desk

अॅट्रॉसिटी कायद्या | आज दलित-आदिवासी संघटनांची ‘भारत बंद’ची हाक

News Desk