HW News Marathi
देश / विदेश

इंदूरमध्ये हॉटेलची इमारत कोसळून १० जणांचा मृत्यू

मध्य प्रदेश | इंदूरमध्ये ४ मजली एका हॉटेलची इमारत कोसळल्याची घटना शनिवारी रात्री घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृतदेह इमारतीच्या ढिगा-यातून बाहेर काढण्यात आले आहेत. या इमारतीच्या ढिगा-याखाली अजून काही जण अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या चार मजली हॉटेलमध्ये एकूण २५ खोल्या होत्या. ही इमारत कोसल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू केले. जखमींवर उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

तसेच ही इमारत ५० वर्षांपेक्षा जास्त जुनी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पण, महापालिकेने ही इमारत धोकादायक असल्याचे जाहीर केले होते का? असा सवाल येथे उपस्थित होत आहे. या दुर्घटनेनंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शोक व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात पुढची १० ते २० वर्षे नरेंद्र मोदींना पर्याय नाही !

Gauri Tilekar

देशाच्या सीमांचे रक्षण करण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी  | बाळासाहेब थोरात

News Desk

आता ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’मध्ये दिसणार पंतप्रधान मोदी

News Desk