HW News Marathi
मुंबई

CBSE चे विद्यार्थी व पालक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी कृष्णकुंज वर

मुंबई | सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थी आणि पालकांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी कृष्णकुंज इथं भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

राज ठाकरे यांनी बारावी आणि दहावीच्या पेपरफुटीमुळे होणारी फेरपरीक्षा न देण्याचं आवाहन पालकांना केलं होतं. तसंच आपण सगळ्या विद्यार्थी आणि पालकांच्या सोबत असल्याचं राज यांनी म्हटलं होतं.

केंद्र सरकारनं त्यानंतर १०वीचा गणिताचा पेपर हा फक्त दिल्ली आणि हरियाणा इथं होणार असल्याचं सांगितले होतं. पण १२ चा अर्थशास्राचा पेपर मात्र २५ एप्रिलला होणार असल्याचंही स्पष्ट केलं होतं.

राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या बाजूनं भूमिका घेतली आणि त्यामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाला अशी प्रतिक्रिया विद्यार्थी आणि पालकांनी राज ठाकरे यांच्याशी बोलताना व्यक्त केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

एटीटी पार्सलच्या जंगलात खून: सुटकेसमध्ये अढळला मृतदेह

News Desk

शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशीही ऐतिहासिक वाढ

News Desk

शौचालयासाठी कंत्राटदारांना मुदतवाढ, दोन वर्षांत दोन हजार शौचालये बांधली जाणार ?

News Desk
देश / विदेश

चीनचं भरकटलेलं स्पेस महाराष्ट्रात कोसळणार ?

News Desk

मुंबई | अंतराळात चीनचं भरकटलेलं स्पेस स्टेशन सोमवारी मुंबईवर कोसळण्याची शक्यता आहे. या स्टेशनच्या मार्गात महाराष्ट्रासह मुंबईचा बराचसा भाग येणार आहे. या चिनी स्पेस स्टेशनचं नाव टीयाँगाँग आहे. स्कूल बसच्या आकाराचं हे स्पेस स्टेशन असल्याची माहिती समोर आली आहे.

अंतराळातून पृथ्वीवर येताना त्याचे तुकडे होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तुकड्यांमध्ये विषारी वायू असल्यानं पृथ्वीवर कोसळल्यानंतर त्याला हात न लावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

या स्पेस स्टेशनच्या मार्गात महाराष्ट्रासह मुंबई, आंध्र प्रदेश, बंगालचा उपसागर आहे. परंतु स्पेस स्टेशन अतितीव्र वेगानं येत असल्यानं कुठे पडेल, याचा अंदाज बांधणं कठीण आहे. सोमवारी पहाटे चार वाजून 55 मिनिटांनी या स्पेस स्टेशननं पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर कुठे कोसळेल, याबाबत अंदाज व्यक्त करता येईल.

त्या प्रमाणे या स्पेस स्टेशनचे तुकडे 200 ते 300 किलोमीटर परिसरात पसरण्याची शक्यताही वर्तवली जातेय.

Related posts

इतिहासातील घटनांचा दाखला देत मोदींचा काँग्रेसवर निशाणा

News Desk

जवानांना मोबाईलमधून ८९ अ‍ॅप्स तात्काळ काढून टाकण्याचे लष्कराचे आदेश

News Desk

चेन्नई विमानतळात प्रवाशाच्या बॅगेत सापडला चक्क बिबट्याचा बछडा

News Desk