HW News Marathi
Covid-19

मनसेचा दणका, कोरोनाबाधितांकडून ज्यादा आकारलेले ३२ लाख हॉस्पिटलकडून परत

नवी मुंबई | नवी मुंबईत कोवीड उपचाराच्या नावाखाली खाजगी दवाखान्यांनी लूटमार सुरू केली होती. आणि या दवाखान्यांवर कारवाई न केल्यास मनसे तीव्र आंदोलन करेल असा इशारा मनसेने मनपा आयुक्त अभिजित बांगर यांना ४ सप्टेंबर २०२० रोजी भेटून लेखी निवेदन देऊन दिला होता.

मनसेने आंदोलनाचा इशारा देताच रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या खाजगी हॉस्पिटलला महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी चांगलाच दणका दिला आहे. शहरातील खाजगी हॉस्पिटलांनी रुग्णांकडून कोरोना उपचाराच्या नावाखाली ज्यादा आकारलेल्या बिलाचे पैसे रुग्णांना परत देण्यास सुरुवात केली असून आता पर्यत एकूण ३२ लाख रुपये परत केले.

तसेच या खाजगी हॉस्पिटलच्या संपूर्ण बिलांची पडताळणी करण्यासाठी विशेष लेखा परिक्षण पथके तयार करण्यात आली असून हि पथके सात दिवसांत हॉस्पिटलच्या बिलांच्या तक्रारीबाबत पडताळणी करून ज्यादा आकारलेल्या बिलांचे पैसे परत करणे, दोषी हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करणे अथवा हॉस्पिटलची मान्यता निलंबित करण्याबाबतची आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेने मनसेला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राच्या राजकारणात मला घ्यावे, एकनाथ खडसेंनी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली इच्छा !

News Desk

काही लोकांना हौस असते आंदोलन करण्याची ! अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा

News Desk

माऊलींच्या पादुका ३० जूनला एसटीने पंढरपूरला जाणार !

Arati More