मुंबई । राज्यात आज कोरोनाबाधित २८६ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ३२०२ झाली आहे. आज (१६ एप्रिल) दिवसभरात ५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३०० रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
#CoronaVirusUpdate
आज नवीन २८६ #coronavirus बाधित रुग्णांची नोंद. राज्याची एकूण संख्या झाली ३२०२. आजपर्यंत ३०० रुग्णांना डिस्चार्ज. आज ७ तर आतापर्यंत १९४ रुग्णांचा मृत्यू- आरोग्यमंत्री @rajeshtope11 यांची माहितीसविस्तर वृत्त- https://t.co/f7fPQ7aTbj pic.twitter.com/KvatyHs3qC
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 16, 2020
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५६ हजार ६७३ नमुन्यांपैकी ५२ हजार ७६२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर ३२०२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७१ हजार ७६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६ हजार १०८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात ७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे ३, पुण्यातील ४ आहेत. त्यापैकी ५ पुरुष तर २ महिला आहेत. आज झालेल्या ७ मृत्यूपैकी ४ जण हे ६० वर्षे किंवा त्यावरील आहेत ३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. मृत्युमुखी पडलेल्या ७ जणांपैकी ६ रुग्णांमध्ये ( ८६ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १९४ झाली आहे.
महाराष्ट्र राज्यात कोरोना मुळे होणाऱ्या मृत्यूचा दर हा देशातील इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. या मृत्यूंची कारणमीमांसा आणि उपाययोजना करण्यासाठी तसेच जिल्हा पातळीवर रुग्णोपचार करणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यस्तरावर तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष दल ( टास्क फोर्स ) स्थापन करण्यात आले आहे. यामुळे राज्यात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी एक हॉटलाईन उपलब्ध होणार आहे.
या टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टरांना सोमवार ते रविवार असे दिवस वाटप करण्यात आले असून या टास्क फोर्समध्ये शासकीय तसेच खाजगी आरोग्य क्षेत्रातील तज्ञांचा समावेश आहे. डॉ. झहीर उदवाडिया , डॉ. नितीन कर्णिक, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. केदार तोरस्कर, डॉ. ओम श्रीवास्तव , डॉ. शशांक जोशी आणि डॉ. राहुल पंडीत या तज्ञांचा या टास्क फोर्समध्ये समावेश आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.