HW News Marathi
Covid-19

कोरोनामुक्त गोपीचंद पडळकरांवर जेसीबीतून चक्क १०० पोती फुलांचा वर्षाव

मुंबई । भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर कोरोनामुक्त झाल्यानंतर पडळकर यांच्यावर चक्क जेसीबीतून फुलांचा वर्षाव करण्यात आला आहे. गोपीचंद पडळकर हे पंढरपूर येथील एका रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर आज (१२सप्टेंबर) पडळकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. याचनिमित्ताने त्यांच्या स्वागतासाठी चक्क १०० पोती फुलांचा वर्षाव करण्यात आला आहे.

कोरोनामुक्त झाल्यानंतर पंढरपुरातील रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर गोपीचंद पडळकरांच्या शेकडो समर्थकांनी जेसीबीमधून त्यांच्यावर गुलाब, झेंडू, निशिगंध, शेवंती अशा 100 पोती भरून फुलांचा वर्षाव केला.राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशीच पडळकर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त आले. त्यानंतर ते पंढरपूरातील एका रुग्णालयात उपचार घेत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोव्हॅक्सिन’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात

News Desk

केंद्र सरकार राज्यांना मोफत लस देणार, लसीकरणाची १०० टक्के जबाबदारी केंद्राची – पंतप्रधान

News Desk

भारताला केवळ सहा-सात वर्षांचाच इतिहास आहे का? त्यापूर्वी हा देशच नव्हता का?, सामनातून भाजपला सवाल

News Desk