मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. प्रामुख्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून काही खोट्या बातम्या पसरवल्या जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आत्तापर्यंत राज्यात २१८ जणांवर गुन्हे दाखल केले असून ४५ आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली आहे.
राज्यात जारी केलेल्या लॉकडाऊनला कही लोकांनी धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावर या बाबी प्रामुख्याने पाहायला मिळाल्या आहेत. फेसबुक पोस्ट ६६ आणि व्हॉट्सअॅपचे ९९ असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर १० जणांना अटकही करण्यात आली आहे. याबद्दलची अधिक माहिती सायबर सेलचे एसीपी बालसिंह राजपूत यांनी दिली आहे.
#कोरोना_वायरस #Coronavirus आणि #लॉकडाऊन #Lockdown ला काही जण धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत, महाराष्ट्रात 218 गुन्हे दाखल, फेसबुक पोस्टचे 66 तर व्हाट्सएप चे 99 गुन्हे दाखल, 10 जणांना अटक- बालसिंह राजपूत, एसपी, सायबर सेल via @News18lokmat@MahaDGIPR @rajputbalsing pic.twitter.com/2EJHqrgOYb
— Maharashtra Cyber (@MahaCyber1) April 16, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.