मुंबई | कोल्हापूर, सांगली कराडमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर-सांगलीतल्या मुसळधार पावसामुळे सर्व नद्या, नाले ओसंडून लागले असून कृष्णा आणि वारणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (८ ऑगस्ट) कोल्हापूर आणि सांगलीच्या पूर परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सकाळी ११ वाजता जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
पाण्याची पातळी पाहता मुंबई-पुणे-बंगळूरु महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. यामुळे कोल्हापूर-सांगलीमधून मुंबईत दररोज १३ लाख लीटर दूध दाखल होते. रंतु मुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि ठप्प असलेल्या वाहतुकीमुळे कोल्हापुरातल्या दूध उत्पादन कंपन्यांनी दुधाचे संकलन थांबवले आहे. त्यामुळे दररोज मुंबईत येणारे 13 लाख लीटर दूध उद्या मुंबईत येणार नाही. त्यामुळे मुंबईकरांना उद्या दूध मिळणार आहे.
कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांतून काल (६ ऑगस्ट) आणि आज (७ ऑगस्ट) एकही दुधाचा टँकर नवी मुंबईत दाखल न झाल्याने मुंबईकरांना उद्या दूध मिळणार नाही. दररोज कोल्हापूरवरून गोकुळचे ७-८ लाख लीटर दूध, वारणाचे ३-४ लाख लीटर दूध, त्यासोबतच चितळे आणि इतर कंपन्यांचे २-३ लाख लीटर दूध मुंबईत आलेले नाही. नवी मुंबईत दूध दाखल झाल्यानंतर या दुधाचा मुंबई, ठाणे, वसई-विरार, पनवेल भागात दूध पुरवठा केला जातो. हा संपूर्ण पुरवठा उद्या थांबणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.