HW News Marathi
Covid-19

‘कोव्हिड योध्यांची’ राज ठाकरेंकडे मदतीची मागणी

मुंबई |  ‘कोव्हिड योद्धे’ म्हणून कोरोनाविरुद्धच्या संकटात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉक्टरांना विमा नाकारल्याचा धक्कादायक आरोप होत आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत मदतीची मागणी केली आहे. कोरोना काळात अडीच लाखांपेक्षा जास्त डॉक्टरांनी सेवा दिली आहे आणि अजूनही देत आहेत. मात्र त्यांना सरकारने विमा कवच नाकारल्याचा दावा करत डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

कोरोना काळात सरकारने डॉक्टरांना सक्तीने क्लिनिक उघडण्यास भाग पाडले, मात्र कोरोनाने बळी गेलेल्या डॉक्टरांचा विमा मात्र नाकारला जात असल्याने या डॉक्टरांनी संताप व्यक्त केला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत अनेक डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र सरकार याबाबत जबाबदारी घेत नसल्याने डॉक्टरांनी राज ठाकरेंकडे मदतीचे गाऱ्हाणे घातले आहे.

दरम्यान, या आधी जिम, धार्मिक स्थळ उघडण्यासाठी राज ठाकरे यांनी आवाज उठवला होता, तर अतिरिक्त वीज बिलांविरोधातही मनसेने राज्यभर आवाज उठवला आहे. आता यावेळी डॉक्टरांच्या या अडचणीला ते कसे मदत करतात आणि सरकारला काय आवाहन करतात या कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खासदार अमोल कोल्हेंची कोरोना चाचणी निगेटिव्ह

News Desk

अंतिम वर्षाचे नुकसान होणार नाही, विद्यार्थांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल | उदय सामंत

News Desk

आगामी शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण पद्धतीबाबत सर्वंकष आराखडा तयार करा

News Desk