HW News Marathi
देश / विदेश

सुषमा स्वराज यांचे पार्थिव पाहून एमडीएचच्या आजोबांनी हंबरडा फोडला

नवी दिल्ली | भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे काल (७ ऑगस्ट) रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ६७ वर्षांच्या होत्या. सुषमा यांना काल रात्री नऊ वाजताच्या सुमारास त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वराज यांचा मृतदेह अंत्य दर्शनासाठी भाजप मुख्यालयामध्ये ठेवण्यात आला होता.

यावेळी एमडीएचचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांनीही स्वराज यांचे अंत्यदर्शन घेत आणि श्रद्धांजली वाहिली. मात्र सुषमा स्वराज यांच्या पार्थिव पाहून हंबरडा फोडला आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. आजुबाजुच्या लोकांनी त्यांना सावरले. धरमपाल यांचे वय ९६ वर्षे आहे. एमडीएच मसाले उद्योग त्यांनीच उभा केला होता. धर्मपाल हे जगातील सर्वात वयोवृद्ध अॅडव्हरटाईज स्टार असून अद्याप एमडीएच मसाल्याचीच जाहिरात करतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोलाकातामध्ये स्फोट, एका लहान मुलाचा मृत्यू

swarit

Raksha Bandhan Special |पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या रक्षाबंधनच्या शुभेच्छा…

News Desk

अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणाऱ्या दुकाने आणि आस्थापनांना निर्बंधातून सूट

swarit