HW News Marathi
देश / विदेश

कर्नाटकात १२ मे रोजी मतदान आणि १५ मे रोजी मतमोजणी

नवी दिल्ली | निवडणूक आयोगाने कर्नाटकमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या तारखा आज जाहीर केल्या आहेत. आयोगाने कर्नाटकात एकाच टप्प्यामध्ये मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकात १२ मे रोजी मतदान होणार असून १५ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून कर्नाटकात आचारसंहिता लागू झाली आहे.

कर्नाटकात सध्या काँग्रेसचे सत्ता असून सिद्धरमैया मुख्यमंत्री आहेत. कर्नाटकात विधानसभेच्या २२४ जागासाठी मतदान होणार आहे. येत्या २८ मे रोजी सिद्धरमैया सरकारचा कार्यकाळ पुर्ण होणार आहे. कर्नाटकात निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापुर्वी येथे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी गेल्या महिन्यात दोन वेळा दौरा केला आहे.

तर दुसरीकडे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोन महिन्यात चार वेळा कर्नाटक दौरा केला आहे. काँग्रेसकडू सिद्धरमैया हेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. तर भाजपकडून बीएस येडियुरप्पा मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मन की बात’ कार्यक्रमातुन पंतप्रधान तिसऱ्यांदा देशाला संबोधित करणार

swarit

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ४ चकमकी, २-३ दहशतवादी लपून बसल्याची शक्यता  

News Desk

रात्री १० नंतरही मी फटाके फोडणार !

Gauri Tilekar