कराड | राज्यभरात मुसळधार पावसामुळे पावसाने सर्वत्र हाहाकार माजला असून लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कराड आणि पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून कृष्णा आणि कोयना नद्यांनी रुद्ररुप धारण करून धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर कराड-विटा मार्गावरील नवीन कृष्णा पूल आज (६ ऑगस्ट) दुपारी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
Maharashtra: National Disaster Response Force (NDRF) team carries out rescue operations in flood-affected areas of Sangli district. #MaharashtraRains pic.twitter.com/uTCdGdbDk7
— ANI (@ANI) August 6, 2019
गेल्या दहा दिवसांपासून कराड आणि पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कृष्णा व कोयना नद्यांनी रुद्ररुप धारण केले आहे. कोयना धरणातील पाणीसाठाही ९५ टीएमसीहून अधिक झाला आहे. त्यामुळे कोयना धरणाचे दरवाजे साडेचौदा फुटांनी उघडण्यात आले आहेत.
Maharashtra: Pune-Bengaluru Highway in Kolhapur’s Shiroli area closed for traffic movement, following water-logging on the route due to continuous rain in the region. pic.twitter.com/ykXYSnHYkB
— ANI (@ANI) August 6, 2019
याशिवाय सातारा जिल्ह्यातील तारळी, धोम, कण्हेरसह सर्व छोट्या-मोठ्या धरणातून कृष्णा, कोयना या प्रमुख नद्यांसह तारळी दक्षिण मांड, उत्तर मांड, वांग या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळेच कराडमध्ये कृष्णा आणि कोयनेच्या प्रीतिसंगमावरून सुमारे २ लाख ७५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.