HW News Marathi
देश / विदेश

#Lockdown2 : फ्रान्समधीलही लॉकडाऊन ११ मेपर्यंत वाढला, राष्ट्रपतींनी केली घोषणा

नवी दिल्ली | जगभरात न दिसणाऱ्या या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जगात कोरोनाबाधितांचा आकडा हा १७ लाखांच्या पुढे गेला आहे. भारतातही ही परिस्थिती सध्या चिंताजनक आहे. त्यामुळे भारतातही २१ दिवसांचा लॉकडाऊन आहे. दरम्यान, महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, ओरिसा या राज्यांनी लॉकडाऊन ३० एप्रिल पर्यंत वाढवला आहेच. पण भारताचा लॉकडाऊन वाढणार का हे आज (१४ एप्रिल) पंतप्रधनांच्या भाषणानंतरच समजेल.

दुसरीकडे फ्रान्समध्येही कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. त्याच पार्श्वभूमीवर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी देशातील लॉकडाऊन हा ११ मेपर्यंत वाढवला आहे. तशी माहितीही त्यांनी ट्विटरवरुन दिली आहे. या काळात कोरोनाशिवायही कोणी आजारी असेल तर ते रुग्णालयात जाऊन शकतात असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, ११ मे नंतर हळूहळू सर्व बाबी पूर्व पदावर येतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Union Budget 2021 |  लेहमध्ये केंद्रीय विद्यापीठ बनवण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा

News Desk

राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार असणार नाहीत !

Gauri Tilekar

छत्रपती शिवरायांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान होऊनही भाजपचे तोंड बंद !

News Desk