नवी दिल्ली | कोरोनाच्या या संकटातून देशाला वाचवण्यासाठी सगळेच जण आपापल्यापरीने शक्य ती मदत करत आहेत. अनेक उद्योजक, कलाकार, सामान्य नागरिक, क्रिकेटपटू सगळ्यांनाच देशाच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज आल्याने आर्थिक मदत मोठ्या प्रमाणत केली जात आहे. अशातच गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारताला ५ कोटी रुपयांची मदत केली आहे. या आधी टाटा समूहाने १ हजार ५०० कोटींची मदत केली होती. त्यानंतर सगळ्यात मोठी रक्कम ही सुंदर पिचाई यांनी दिली आहे. chaiन दिसणाऱ्या या विषाणूने जगातील सर्व देशांना हादरवून सोडले आहे. मात्र, देशातून सर्व स्तरांवरुन नागरिक खंबीरपणे उभे राहून या विषाणूशी सामना करत आहेत. दरम्यान, पिचाई यांनी केलेल्या या मदतीचे गीव्ह इंडिया यांनी ट्विट करत आभार मानले आहे.
Thank you @sundarpichai for matching @Googleorg 's ₹5 crore grant to provide desperately needed cash assistance for vulnerable daily wage worker families. Please join our #COVID19 campaign: https://t.co/T9bDf1MXiv @atulsatija
— GiveIndia (@GiveIndia) April 13, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.