HW News Marathi
देश / विदेश

हेलिकॉप्टर मनी म्हणजे काय? याचा देशाच्या तिजोरीला उपयोग होणार?

नवी दिल्ली | कोरोनाच्या विळख्यात देश अत्यंत बिकट परिस्थितीत अडकला आहे. दरम्यान, देशाची आर्थिक परिस्थिती ही पुर्णपम ढासळली आहे. अशातच हेलिकॉप्टर मनीची चर्चा सुरु झाली आहे. हेलिकॉप्टर मनी म्हणजे या द्वारे सरकार लोकांच्या खात्यात रक्कम जमा करु शकते. त्यामागचा उद्देश असा आहे की जर कात्यात जास्त पैसे असतील तर लोकं ते खर्च करतील आणि हळूहळू अर्थव्यवस्था सुरळीत होण्यास मदत होईल.

या हेलिकॉप्टर मनीचा पहिला प्रयोग प्रथम नोबेल पारितोषिक मिळवणारे अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रीडमॅन यांनी केला होता. अपारंपरिकरित्या आर्थिक धोरणात मोठ्या प्रमाणात बदल करणे आणि मोठ्या प्रमाणात नोटा छापून विकासासाठी बाजारात आणणे, हा या मागील उद्देश असतो. कोणताही देश जेव्हा आर्थिक मंदीत असतो तेव्हा हा पर्याय वापरला जातो.

कोरोनाच्या या भयावह संकटानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर जपान, अमेरिकेसह जगातील काही देश हेलिकॉप्टर मनी (पैसा) या प्रयोगाचा उपयोग करू शकतात. याचे कारण असे आहे की, आगामी काळात बाजारात घसरण झाल्यामुळे जनता, व्यापारी खरेदी करणे थांबवल्यास अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान होऊ शकते. अशी परिस्थिती रोखण्यासाठी युरोपसह अनेक केंद्रीय बँका आर्थिक वाढीचा दर वाढवण्यासाठी अशी पावले उचलू शकतात. दरम्यान, भारताकडेही हा पर्याय उपलब्ध आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्तव्यपथावर ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्त‍ि’वर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ

Aprna

कोरोना व्हायरसच्या विळख्यातून ९० भारतीय मायदेशी परतले

swarit

पाकिस्तानसारख्या बदमाश देशाला चोरून प्रेमपत्र पाठवायची आवश्यकता काय ?

News Desk