HW News Marathi
देश / विदेश

दिल्ली-एनसीआर भागात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर ३.५ इतकी भूकंपाची तीव्रता

नवी दिल्ली | देशात कोरोनाच्या विळख्यात आडकला आहे. तर दुसऱ्या बाजुला दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळाली आहे. आज (१२ एप्रिल) सायंकाळी दिल्ली शहर आणि एनसीआर या भागात भूकंपाचे धक्क जाणवले. भूकंपाच्या धक्के जाणवू लागल्यानंतर अनेक लोक घराच्या बाहेर पडले होते. दिल्लीसह गाजियाबाद येथेही भूकंपाचे धक्के जाणवले.दिल्ली-एनसीआर भागातील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.५ इतकी नोंदवली गेली आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. कोरोना बाधितांची संख्या पाहाता देशाती महाराष्ट्र आणि ओडिशा राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांना घरा राहण्याचे आवाहन केंद्र आणि राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. मात्र, आता दिल्ली आणि एनसीआरमध्ये कोरोनाचे धक्के बसू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…सरकारला काळे कायदे रद्द करावे लागतील”, राहुल गांधींचं केंद्राला आव्हान!

News Desk

लोकसभेच्या लॉबीतच अरविंद सावंतांनी मला धमकावलं ! नवनीत राणांचा गंभीर आरोप

News Desk

Ayodhya Verdict : आत ५ मार्चला होणार पुढील सुनावणी

News Desk