HW News Marathi
देश / विदेश

मोदी आणि राज यांच्यात का..रे…दुरावा..!

 

“२०१९च्या निवडणुकीत भारत “मोदी मुक्त” करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपले मतभेद विसरुन एकत्र यावे” असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडव्याच्या मेळाव्यात केले आहे. पुढे “भारताला १९४७ साली स्वतंत्र्य मिळाले, १९७७ साली आणबाणीतून दुसरे स्वातंत्र्य, २०१९ मध्ये तिसऱ्यांदा मोदीमुक्ती भारत करायचे आहे.” असे त्यांनी म्हटले.

हेच राज ठाकरे २०११मध्ये गुजरात दौऱ्यावर गेले होते. तेव्हा गुजरातच्या विकासाच्या आधारवर महाराष्ट्राच्या विकासांची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी हातभार म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुजरात दौऱ्यावर गेले होते. “हा आपला अभ्यासदौरा आहे, त्याचा राजकारणाशी याचा काही संबंध नाही,’ असे राज यांनी आधीच स्पष्ट केले होते. या दौऱ्यात त्यांनी गुजरातच्या विकासाचे भरभरुन कौतुक केले होते.

पण, राज ठाकरे यांच्या गुजरात दौऱ्यावर शिवसेनेनी टीका केली होती. की, “गुजरातच्या ब्रॅण्ड ऍम्बेसेडरची जाहिरात आल्यावर ‘ते’ तिकडे गेले असावेत”, अशी टीका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज यांचे नाव न घेता केली होती.

त्यानंतर २०१४मध्ये लोकसभेचे वारे वाहू लागले होते. तेव्हा राज ठाकरे यांनी पंतप्रधानपदासाठी मनसेचा पाठिंबा भाजपचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनाच आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा यावेळी केली. आपले खासदार नक्की निवडून येतील आणि ते लोकसभेत नरेंद्र मोदींनाच पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देतील, असे त्यांनी स्पष्ट केले. देशाच्या भविष्यासाठी मोदीच पंतप्रधान झाले पाहिजेत, असे मतही त्यांनी मांडले. राज यांचे भाजपशी असलेले सलोख्याचे संबंध यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले होते.

२०१९च्या आगामी निवडणुकीत मोदी विरोधी लाट वाहत आहेत. तर सत्तेत येण्यासाठी प्रादेशिक पक्षाशी जुळवून घेण्यासाठी मोदी कोणती राजनितीचा वापर करतील याकडे सर्वांचे लक्ष्य लागेल आहे. पण आता मात्र परिस्थती पुर्णपणे बदली आहे. २०११मध्ये गुजरात मॉडेल पाहून राज ठाकरे हे गुजरात दौऱ्यावर गेले होते. आता हेच राज ठाकरे देशातील सध्याची परिस्थीती पाहून ‘मोदी मुक्त’ भारत हा नारा देत आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बागेश्वर बाबांनी संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून राज्यभरात नाराजी

Aprna

“……. तर केंद्र सरकार लवकरच कोसळणार”, माजी मुख्यमंत्र्याचा इशारा

News Desk

सर्वोच्च न्यायालयाच्या प्रख्यात वकील इंदिरा जयसिंह यांच्या घरावर सीबीआयचा छापा

News Desk