HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला करमणुकीची गुढी उभारली | राम कदम

मुंबई | गुढीपाडव्याला राज ठाकरे यांनी करमणूक केल्याची टीका भाजपचे आमदार राम कदम यांनी ट्विटरवरुन केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडव्या मेळाव्यात केंद्र आणि राज्य सरकरावर तोफ डागली होती. त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात ठाकऱ्यांच्या सभेच्या चर्चा रंगल्या आहेत.

“सुटीच्या दिवशी जमलेल्याचे चांगले मनोरंजन झाले. या देशातील माध्यमे स्वतंत्रच आहेत. मनसेला भाव देत नाही, म्हणून माथी भडकावली जाऊ नयेत. पवारांकडून नीट धडे घेतलेले दिसत नाही” असे ट्विट राम कदम यांनी केले. तसेच विधानसभा ‘मनसेमुक्त’ झाली, उरलेसुरलेले नगरसेवक पळून गेले असे प्रत्युत्तर भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्यापासून सरकारी कर्मचारी तीन दिवसीय संपावर…

News Desk

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

News Desk

ऑपरेशन क्लिनअप – भाग २ सुरू ! पोलीस आयुक्त हेमंत नगराळे ‘ऍक्शन मोड’मध्ये

News Desk