HW News Marathi
मुंबई

औरंगाबादचा कचरा विधानसभेत पेटला, कामकाज तीन वेळा तहकूब

मुंबई | औरंगाबाद शहरातील कचऱ्याचा प्रश्न आज अधिवेशनात गाजला. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रश्नी आवाज उठवला. औरंगाबाद महापालिका आयुक्तांना तातडीने सक्तिच्या रजेवर पाठवा तसेच पोलीस आयुक्तांवर निलंबनाची कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली.

याच मुद्दावरून सभागृहात गोंधळ झाल्याने तब्बल तीन वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. गेल्या २० दिवसांपासून औरंगाबाद शहरातील कचऱ्यांचा प्रश्न पेटलेला आहे. कचरा व्यवस्थापनाची कुठलीही व्यवस्था नसल्याने नागरिकांनी मिळेल त्या ठिकाणी कचरा टाकला आहे. परिणामी संपूर्ण शहरात दुर्गंधी पसरली आहे. काही ठिकाणी लोकांनी पर्यायी डम्पिंग ग्राउंड सुरू केल्याने वाद उद्भवला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छगन भुजबळांच्या प्रकृतीची विधानपरिषद सभागृहात चिंता योग्य उपचार करण्याची धनंजय मुंडे यांची मागणी

News Desk

नौदलाच्या गार्डची गोळी झाडून आत्महत्या

News Desk

राज्य सरकारचा निर्णय, मुंबईसह तीन जिल्ह्यात सुटी जाहीर

swarit