HW News Marathi
महाराष्ट्र

अकोला जिल्ह्यात ७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण, कोरोना बाधितांची संख्या ९ वर

अकोला | महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. राज्यात १६९ जणांना रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ३०४ वर पोहोचली आहे. अकोला जिल्ह्यात एका दिवसात ७ कोरोना रुग्ण आढळून आले. यानंतर आता अकोल्यातील कोरोना रुग्णांची संख्या ९वर गेली आहे.

अकोल्यात दोन कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेत त्यांची चाचणी केली. जिल्हा प्रशासनाने जवळपास १४८ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी १०० जणांचे रिपोर्ट आले असून त्यातील १०० जणांचा रिपोर्ट निगेटिव्ही आला तर बाकीच्या ९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले आहे. तर २ जणांचे रिपोर्ट आधीच आला होता. तर उरर्वत सात जणांचा रिपोर्ट आज आला. या ९ कोरोना रुग्णांवर वाशिममधील एका करोना रुग्णाच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांना लागण झाल्याचं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितलं.

एकट्या मुंबईत १४३ अढळे असून मुंबईतील रुग्णांची संख्या ८५७ वर गेली आहे. तर मुंबई पाठोपाठ पुणे शहर १६८, पिंपरी-चिंचवड २२, पुणे ग्रामीण १४ आणि आकोला ७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील मुंबईसह, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे शहरांसह अकोला ग्रामीण भागात देखील कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूरकरांच्या प्रश्नासाठी उपमुख्यमंत्री भेटणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना…!

News Desk

पीक विम्याच्या बीड पॅटर्नला केंद्राचा रेड सिग्नल, रब्बी हंगामासाठी तरी परवानगी द्यावी, दादा भुसेंची मागणी

News Desk

देश सेवेसाठी लष्करात जाण्याचा दलित तरुणांना सल्ला – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

News Desk