HW News Marathi
Covid-19

बारामतीत कोरोनाचा पहिला बळी,भाजीविक्रेत्याच्या मृत्यु ..

बारामती : शहरातील कोरोनाबाधित भाजीविक्रेत्याचा आज पहाटे मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली असून आता सर्वांनीच कमालीची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीस अर्धांगवायूचा त्रास होता, त्यांची प्रतिकारशक्तीही कमी होती. त्यांना दवाखान्यात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला.

बारामतीत एका रिक्षाचालकाचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अवध्या आठ दिवसांनी शहरातील भाजी विक्रेता करणाऱ्या व्यक्तीचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. या व्यक्तीशी जो-जो संपर्कात आला. त्यांचा शोध घेत आला. त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना तपासणी करण्यासाठी बारामतीहून पुण्याला नेण्यात आले होते. या व्यक्तींपैकी 9 जणांचा रिपोर्ट समोर आले आहेत. त्यांपैकी 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तरी आणखी तिघांचे रिपोर्ट यायचे असल्याचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे त्यांनी माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिहार पोलिसांना एकही पदक न मिळाल्याने महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना मोठे दु:ख !

Gauri Tilekar

आज राज्यात ३२५४ कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, तर १८७९ रुग्णांना डिस्चार्ज

News Desk

‘पुण्यातील इतर दुकानं सुरु, पण मॉल्स का बंद?’, अजित पवारांनी सांगितलं कारण  

News Desk