HW News Marathi
महाराष्ट्र

अकोल्यात आणखी १ कोरोना पॉझिटिव्ह, अकोल्यात २ कोरोना पॉझिटिव्ह

अकोला | अकोल्यात कोरोनाच इतके दिवस शिरकाव झाला नव्हता. पण अकोल्यात १ कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता पुन्हा दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. काल (७ एप्रिल) बैदपुरा परिसरात पहिला पॉझिटीव्ह रुग्ण आढळलल्यानंतर आज (८ एप्रिल) अकोटफैल परिसरात दुसरा पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने अकोलेकरांच्या ह्दयाचे ठोके वाढले आहेत. अशातच आता बैदपुरा परिसर सील केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने अकोटफैल परिसरही सील करण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, आज अकोल्यातील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या घरी चोरी झाल्याची खळबळजनक घटना अकोल्यात घडली आहे. अकोला शहरातील बैदपुरा भागात या रुग्णाचे घर असून या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याने सर्व कुटुंबीय जिल्हा रुग्णालयात असल्याचे चोराने डाव साधला. त्यामूळे एकीकडे वाढत्या कोरोनाबाधितांची संख्या कशी आटोक्यात आणायची हा प्रश्न प्रशासन आणि पोलीसांसमोर असताना आता चोरी कडून पळालेल्या या चोराला पकडून त्या क्वॉरंटाईन करण्याचे आवाहन पोलीस आणि प्रशासनासमोर आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘उद्धव ठाकरे गुंडाराज थांबवा’ निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा भाजपचा आरोप !

News Desk

कोरोनाचा प्रादुर्भाव घटला, पाच जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घ्या, आंबेडकरांची मागणी!

News Desk

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आणि कार्य जगभरातील राज्यकर्त्यांसाठी आदर्श! – उपमुख्यमंत्री

Aprna