बेंगळुरू | भाजप कर्नाटक प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा हे आज (२६ जुलै) सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी येडियुरप्पा यांनी त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केला आहे. अंकज्योतिषांच्या सल्ल्यानुसार येड्डीयुरप्पांनी त्यांच्या नावाच्या इंग्रजी स्पेलिंगमधील एक ‘डी’ हटवून ‘आय’ या अक्षराचा समावेश केला आहे. राज्यपाल वाजूभाई वाला यांना सत्ता स्थापनेसाठी पाठवलेल्या पत्रात त्यांनी आपल्या नावाच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये बदल केला आहे.
#Karnataka: BJP State President BS Yeddyurappa arrives at BJP office in Bengaluru. He will take oath as Chief Minister today at 6 pm. pic.twitter.com/sq7G0hXd4p
— ANI (@ANI) July 26, 2019
येडियुरप्पा याआधी आपले नाव B.S. Yeddyurappa असे लिहित होते. आता त्यांना शपथविधीपूर्वी B.S. Yediyurappa असे आपले नाव केले आहे. यापुढे ते Yediyurappa असे लिहिणार आहेत. २००७ च्या आधी येडियुराप्पांच्या नावाचे स्पेलिंग Yediyurappa असेच होते. परंतु, त्यानंतर त्यांनी आपल्या स्पेलिंगमध्ये बदल केला. नुकतेच त्यांनी भाजपचे राष्ट्रीय आणि गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रातूनच त्यांनी आपल्या नावाचे स्पेलिंग बदलल्याचे समोर आले आहे. येड्डीयुरप्पांनी १०५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र राज्यपालांना दिले आहे. मात्र, ३२ जुलैपर्यंत त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.