HW News Marathi
देश / विदेश

MPSCच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई | ‘एमपीएससी’च्या वतीने २६ एप्रिल रोजी घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा त्याचप्रमाणे १० मे रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यमसेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलण्यात आल्याची माहिती राज्य शासनाने दिली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हा निर्णय घेतला आहे. आपला संपूर्ण देश सध्या ‘कोरोना’च्या संकटाचा सामना करत आहोत. दरम्यान, ‘कोरोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या एकूण २१ दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. सर्वजण सध्या सुरक्षेच्या कारणास्तव घरात आहेत. दरम्यान, १४ एप्रिलला जरी हा २१ दिवसांचा लॉकडाऊन संपणार असला तरीही पुढचे किती दिवस कोरोनाशी आपला लढा चालू राहणार हे अद्याप सांगता येत नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“योग दिवसाच्या आड आजचा लपण्याचा दिवस नाही”, राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

News Desk

मुंबईत होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी संग्रहालय

News Desk

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक, ३ दहशतवादी ठार

News Desk