HW News Marathi
महाराष्ट्र

छगन भुजबळांवर शिवसेनेची बॅनरमधून जहरी टीका

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी काल (२५ जुलै) शिवसेनेत प्रवेश केला होता. अहिर यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छनग भुजबळ शिवसेनेत प्रवेश करण्यार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या. परंतु शिवसेनेत जाणार ही निव्वळ अफवा असल्याचे खुद्द भुजबळांनी प्रसार माध्यमांना सांगून चर्चेला पूर्णविराम रावला असला तरी काही कट्टर शिवसैनिकांनी बॅनरबाजी करून भुजबळांवर टीकास्त्र सोडले आहे. “तुम्ही बाळासाहेब ठाकरे दिलेला त्रास महाराष्ट्रातील जनता विसरू शकत नाही.”, असे कट्टर शिवसैनिकांनी बॅनरमधून भुजबळांवर निशाणा साधला आहे.

“केसात गजरा आणि गावभर नजरा अशा काहीतरी नावाचे पूर्वी तमाशात वग नाट्य व्हायचे त्यातले प्रमुख पात्र लखोबा लोखंडे यांच्या मिळते जुळते वाटते! उगवला दिवस की मी परत येतो…साहेबांना दिलेला त्रास महाराष्ट्रातील जनता विसरु शकत नाही आपण आहे.” तिथेच रहा…असा मजकूर लिहून भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. रविंद्र तिवारी या शिवसैनिकाच्या नावाने हा बॅनर लावला आहे. असे बॅनर्स शिवसेना भवनाच्या समोर, मातोश्रीच्या समोर आणि मुंबईतील प्रमुख चौकांमध्ये झळकत आहेत.

१९९१ मध्ये भुजबळ यांनी शिवसेनेची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला, आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर ते त्या पक्षात गेले. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी भुजबळ यांचा सामना चांगलाच रंगला होता. बाळासाहेबांना अटक करण्यापर्यंत भुजबळ यांनी दुष्मनी घेतली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवाजी महाराजांच्या जागी आम्ही उदयनराजेंना मानतो…

swarit

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली

Aprna

मंत्री पकंजा मुंडेंच्या गावात जलयुक्तमध्ये घोटाळा

News Desk