HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनामुळे तिघांचा मृत्यू, पुण्यात मृतांची संख्या ८ वर पोहोचली

पुणे | पुणे शहरातील ससून रुग्णालयात आज (७ एप्रिल) आणखी तिघांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनामुळे मृत झालेल्या तिघांचे वय हे साठ वर्षांपेक्षा अधिक असल्याचे कळाले आहे. त्यापैकी दोघांना किडनी, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. पुण्यातील मृतांची संख्या आता आठवर पोहोचला आहे. या तिघांचा आज सकाळी ९ ते ११ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

मुंबईनंतर आता पुण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या १५९वर पोहोचली आहे. आज शहरात नवे १७ रुग्ण आढळले असून काल (६ एप्रिल) ही संख्या ३७वर गेली होती. त्यामुळे शहरात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शहारातील पूर्व भाग सील करण्यात आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितेश राणेंना मोठा धक्का! सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालायने जामीन अर्ज फेटाळला

Aprna

दारू पिऊन नाचणारे 12 इंजिनियर निलंबित: विडीओ वायरल

News Desk

..तर ‘एटीएस’ने आता नाना पटोले यांचीही चौकशी करावी – सामना

News Desk