मुंबई | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने चिंतेचे कारण बनत चालले आहे. सरकार सर्व स्तरावर प्रयत्न करत आहे. सरकारी कर्मचारी, अत्यावश्यक सेवा हा सुरुच आहेत. त्यामुळे त्यांचेही स्वास्थ्य उत्तम राहणे गरजेचे असल्याने सरकारने मंत्रालयात यापुढे काही महिने मास्कशिवाय कोणालाही प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील ट्विटही ए.एन.आयने केले आहे.
Wearing face masks has been made compulsory for all staff, officers and visitors to Maharashtra Mantralaya for the coming few months. No entry to anyone without face masks. The decision has been taken in view of prevention of #Coronavirus: Maharashtra government
— ANI (@ANI) April 6, 2020
एएनआयने ट्विट केल्यानुसार, मंत्रालयातील सर्व कर्मचारी, अधिकारी या सगळ्यांना मास्क घालूनच प्रवेश करता येणार आहे. कोरोनाचा राज्यातला वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने ही पावले उचलली आहेत. कोरोना लवकरात लवकर निघून जावा यासाठी सरकार सर्वतपरी प्रयत्न करत आहे.
या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र मंत्रालयातील सर्व कर्मचारी, अधिकारी आणि अभ्यागतांना मास्क परिधान करणे अनिवार्य करण्यात आले आहे. पुढचे काही महिने मास्कशिवाय कोणालाही मंत्रालयात प्रवेश मिळणार नाही. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.