HW News Marathi
महाराष्ट्र

भाऊ – बहिण एकत्र आले तर परमेश्वराला सर्वात मोठी पूजा घालेल | चंद्रकांतदादा पाटील

मुंबई | विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे एकत्र आले तर मीच परमेश्वराला सर्वात मोठी पूजा घालेल असे सांगताच आज विधानपरिषदेत चांगलाच हशा पिकला.

राज्यपाल अभिभाषणा दरम्यान धनंजय मुंडे यांनी कर्जंमाफी झालेल्या शेतक-यांची यादी पटलावर ठेवण्याची मागणी केली होती. या चर्चेला उत्तर देतांना चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्या जिल्ह्यात कर्जमाफी झालेल्या

शेतक-यांचे मेळावे घेऊन त्या मेळाव्यांना मी आणि धनंजय मुंडे सोबत जाऊ, हवे तर बीड मध्येही मेळावा घेऊ अशी तयारी दर्शविली. त्यावर आमदार सतीश चव्हाण यांनी बीड मध्ये मेळाव्याला दोघेच जाणार का ? पालकमंत्री यांना बोलावणार नाही का ? अशी कोटी केली त्यावर चंद्रकांत दादा यांनी हे दोघे एक आल्यास मी देवाला सर्वात मोठी पूजा घालेल असे उत्तर दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची सवय विरोधी पक्ष लवकरात लवकर मोडेल तेवढे बरे!

News Desk

“मुख्यमंत्र्यांनी राज्यात शरिया राजवट जारी करणे बाकी ठेवले आहे”; अतुल भातखळकरांची टीका!

News Desk

राज्याला सर्वांगीण विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी क्रांतिकारक पाऊल! – मुख्यमंत्री

Aprna