मुंबई | राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधिताचा आकडा ७४८ वर येवून पोहोचला आहे. एकट्या मुंबई ८१, पुणे १८, औरंगाबाद ४ अहमदनगर ३, कल्याण-डोंबिवली २, ठाणे २, उस्मानाबाद १, वाशी १, इतर १ असे मिळून आज (५ एप्रिल) ११३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत अनेकजण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत ५६ जण बरे होऊन घरी गेले आहेत.
Total number of #Coronavirus positive cases in Maharashtra rises to 748 after 113 positive cases reported in the state today so far, 56 people have been discharged after recovering from the disease: Maharashtra Health Department pic.twitter.com/VJlicneEcW
— ANI (@ANI) April 5, 2020
दरम्यान, आज दिवसभरात राज्यात कोरोना रुग्णांची संख्येत वाढ झाली. त्याचबरोबर १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. यात मुंबई ८, पुणे ३, औरंगाबाद आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये प्रत्येकी १ जण दगावला आहे. यामुळे आता राज्यात कोरोनामुळे एकूण ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना बाधितांची संख्या ३ हजार ५७७ वर पोहोचली तर ८३ जणांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच गेल्या २४ तासात देशभरात ५०५ नवी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
Total number of #COVID19 positive cases rise to 3577, death toll increases to 83: Ministry of Health and Family Welfare
There has been a spike of 505 positive cases in the last 24 hours. pic.twitter.com/zXf4mvd12a
— ANI (@ANI) April 5, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.