HW News Marathi
देश / विदेश

‘चांद्रयान – २’च्या यशानंतर आता इस्रो सूर्याला गवसणी घालणार

नवी दिल्ली । भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने सोमवारी (२२ जुलै) चंद्रयान-२ चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. चांद्रयानच्या यशानंतर आता इस्रो पुढील वर्षी २०२० च्या मध्यात सूर्याच्या बाह्यमंडलाचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-१ हे यान अंतराळात सोडणार असल्याची घोषणा केली आहे.

सूर्याच्या बाह्यमंडलास तेजोमंडल संबोधले जात असून ते हजारो किलोमीटरपर्यंत विखुरले आहे. तेजोमंडलाच्या तप्तपणाचे गूढ उकलण्यात भौतिकशास्त्रज्ञांना अद्यापही यश आलेले नाही. त्यासाठीच इस्रोने एक पाऊल पुढे टाकत लक्ष्य सूर्यावर केेंद्रित केले आहे.आदित्य एल-१ सूर्याच्या फोटोस्पेयर, क्रोमोस्पेयर आणि तेजोमंडलचा अभ्यास करणार आहे. सूर्यातून बाहेर पडणार्‍या स्फोटक कणांचा अभ्यासही करणार आहे. हे कण निरुपयोगी असल्याने त्यांचा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातील प्रवेश अनावश्यक असल्याचे इस्रोने म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘गुगल प्लस’ सेवा बंद करणार, ही आहेत कारणे

Gauri Tilekar

एअर इंडियाचे कर्मचारी भूताला घाबरले

News Desk

जाणून घ्या… कधी होणार राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान आणि मतमोजणी

Aprna
मुंबई

येत्या २६ जुलैला मुंबईत जोरदार पाऊस पडणार | स्कायमेट

News Desk

मुंबई । गेल्या काही दिवसात पावसाने मुंबईकडे पाठ फिरवली होती. मात्र, २६ जुलैला मुंबईत अतिवृष्टी इशारा स्कायमेटने वर्तविला आहे. २६ जुलैला कोकण, गोवा तसेच मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, अशी अंदाजही वर्तविली जात आहे. त्याचबरोबर २७ आणि २८ जुलै रोजीही मुंबईत जोरदार पाऊसाचा जोर कायम असल्याचे सांगितले आहे.

तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बरसेल. तर विदर्भ व मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पश्चिम किनारपट्टीवर म्हणजेच उत्तर केरळ आणि कर्नाटकमध्ये सध्या पाऊस सुरू आहे. या पावसाचा प्रवास उत्तर दिशेने होणार असून, याचा परिणाम म्हणून मुंबईत पाऊस वाढेल. त्यामुळे २६ जुलै २००५ च्या पावसाची यंदा पुनरावृत्ती होण्याची भीती मुंबईकरांना वाटू लागली आहे.

 

Related posts

सतीश शेट्टी खून प्रकरणाची श्वेतपत्रिका काढावी आरटीआय अ‍ॅक्टिव्हिस्ट फोरमची मागणी

News Desk

निकाल लागला पण विद्यार्थ्यांनी नाही पाहिला

News Desk

शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशीही ऐतिहासिक वाढ

News Desk