HW News Marathi
Covid-19

पुण्यात 3 वर्षाच्या मुलीला कोरोना , निजामुद्दीनला गेलेल्या आजोबांमुळे संसर्ग झाल्याची शक्यता !

पुणे : काल मुंबईमध्ये एका तीन दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली,सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. आता पुण्यात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीला कोरोनाची लागण झाली आहे. याच कनेक्शन दिल्लीत झालेल्या कार्यक्रमाशी आहे. निजामुद्दीनमधीलतब्लिगी जमातच्याकार्यक्रमाहून परतलेल्या आजोबांमुळे तिला संसर्ग झाल्याचा अंदाज आहे.

या मुलीच्या आजोबांना ‘कोरोनाची लागण झाल्यामुळे ते मंगळवारी पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातल्या तीन वर्षांच्या मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजोबा दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या धार्मिक कार्यक्रमाहून परतले होते, त्यांच्याकडून नातीला संसर्ग झाला आहे.

2 एप्रिलला पुण्यात कोरोनाबाधित सात नवे रुग्ण सापडले असून, त्यापैकी दोघे निजामुद्दीनहून परत आलेले आहेत. महाराष्ट्रातून दिल्लीतील कार्यक्रमाला 1500 लोक गेल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे त्यानंतर आता महाराष्ट्रातील कोरोनाचा धोका अधिक वाढला आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात फॅमिली प्लॅनिंग केले असते तर लसींचा साठा कमी पडला नसता !

News Desk

राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार ! 

News Desk

देशांतर्गत विमानप्रवासासाठी ‘या’ आवश्यक अटी व शर्थी

News Desk