HW News Marathi
महाराष्ट्र

मी एकट्या भाजपचा नव्हे, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री !

मुंबई | “मी फक्त भाजपाचा मुख्यमंत्री नाही. तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री आहे. कारण राज्यात शिवसेना-भाजपाचे सरकार आहे. ” असे सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (२१ जुलै) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधिक करताना केले आहे. मुख्यमंत्री पुढे असे देखील म्हणाले की, “विधानसभा निवडणूक युतीतच लढवणार असून लवकरच जागावाटप होईल, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सांगतले.” यावेळी ते असे देखील म्हटले की, निवडणुकीबद्दल कोणताही संभ्रम मनात ठेवू नका, आणि लोकसभा निवडणुकीतील विजयाने हुरळून देखील जाऊ नका. विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागा, असे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री कोण होणार यावर अनेक जण प्रश्न उपस्थित करत आहेत. यावर सर्व प्रसार माध्यमांना खात्य हवे असे मग ते यांना विचार आणि त्यांना विचार असे करतात. मग काय काही लोकांना बोलयची खुमखुमी असलेले अनेक जण आहेत. परंतु तशी मंडळी आमच्याकडे देखील आहेत. मात्र मित्रपक्षाकडे जरा जास्त असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला चिमटा काढला आहे. यावरून सध्या शिवसेनेकडून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेचे संजय राऊत यांनी नाव पुढे केले आहे.

जनतेला गृहीत धरण्याची चूक कोणी करू नये, असे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील जनता माझ्यासाठी दैवत आहे. मतदारांनी दिलेला जनादेश अभिमानाची गोष्ट आहे. मात्र त्याचा कोणीही गर्व करू नये. आपली लढाई पराभूतांविरुद्ध असल्याने कोणतीच भीती बाळ‍गण्याचे कारण नसल्याचे म्हमत त्यांनी विरोधकांनाही धारेवर धरले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिलेले ‘हे’ वचनपूर्ण केले

News Desk

गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अनिल देशमुखांची उच्च न्यायालयात धाव

News Desk

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या एकरकमी लाभाच्या योजनेस १०० कोटींचा निधी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली मान्यता

Aprna