HW News Marathi
मनोरंजन

कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी नाम फाऊंडेशनकडून केंद्र-राज्य सरकारला प्रत्येकी ५० लाखांंची मदत

मुंबई | देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत जात आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्याने एक हजारा पार केले आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा २०० वर गेला आहे. कोरोनाशी लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. या आवाहाना उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत असून यात आता अभिनेता नाना पाटेकर आणि अमिनेता मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशने मदतीचा हात पुढे केला आहे.

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशने मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत केल्याची माहिती ट्वीट करून सांगितली आहे. यात नाना पाटेकर यांनी ट्वीटमध्ये म्हणात की, महाराष्ट्रात कोरोनाचा सामना करण्याची सामाजिक जबाबदारी ओळखून माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाम फाउंडेशन ५० लाख रुपयांचे योगदान करत आहे, असे ट्वीट केले असून यात नाना पाटेकरांनी एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे.

काय म्हणाले नाना पाटेकर

या क्षणाला आपण सर्वांनी जात-धर्म विसरुन सरकारला सहकार्य करणे गरजेचे आहे. इतक्या मोठ्या संकटाशी सरकार एकटे लढू शकत नाही. यासाठी आपण आपआपला वाटा उचलायला हवा. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून मुख्यमंत्री व पंतप्रधान सहाय्य निधीसाठी प्रत्येक ५० लाख रुपये पाठविणार आहोत. तुम्ही तुमचा वाटा उचलणार यांची खात्री आहे. कृपया घराबाहेर पडू नका. सध्या घराबाहेर न पडण हीच मोठी देशसेवा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समाजात विष पेरले गेले !

News Desk

सुपरस्टार राजेश खन्नांची १० सुपरहिट गाणी

News Desk

विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार महेश एलकुंचवार यांना जाहीर

News Desk