HW News Marathi
महाराष्ट्र

विमा कंपन्यांविरोधात शिवसेनेच्या ‘धडक मोर्चा’ला सुरुवात

मुंबई | पीक विम्या कंपन्यांच्या मनमानीविरोधात शिवसेनेने आज (१७ जुलै) ‘धडक मोर्चा’ला सुरुवात झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्तवाखाली युवा नेता आदित्य ठाकरे यांच्यासह सेनेचे आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले आहे. या मोर्चाला सकाली ११ वाजल्यापासून सुरुवात झाली असून बीकेसीतील एशियन हार्ट हॉस्पिटलपासून मोर्चाला प्रारंभ झाला आहे.

राज्यातील अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळालेली नाही. या शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, त्यांना त्यांच्या हक्काचे पीक विम्याचे पैसे मिळालेच पाहिजेत. शेतकऱ्यांना नडाल तर शिवसेना आपल्या स्टाइलने उत्तर देईल, असा इशारा मोर्चातून देण्यात आला आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) ‘भारती ऍक्सा’ या कंपनीच्या कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची जाहीर सभाही होणार आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भोंदूबाबाने 3 मुलींवर केला बलात्कार, राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली: चित्रा वाघ यांची सरकारवर टीका

Aprna

भुजबळांमुळे माझा विजय

News Desk

गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

News Desk