HW News Marathi
महाराष्ट्र

केजरीवाल समोर दिल्लीच्या मुख्य सचिवांना आपच्या आमदारांकडून धक्काबुक्की

नवी दिल्लीः दिल्ली सरकारमधील मुख्य सचिवांना काल रात्री मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमोर आपच्या दोन आमदारांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. मुख्य सचिव अंशू प्रकाश यांनी हा आरोप केला आहे. सोमवारी रात्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी दिल्लीतील नागरिकांना घरबसल्या सेवा पुरवण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी प्रकाश यांना पाचारण करण्यात आले होते. यावेळी आम आदमी पक्षाच्या दोन आमदारांनी प्रकाश यांना धक्काबुक्की केली तसेच अर्वाच्च भाषा वापरली. हा सर्व प्रकार केजरीवाल यांच्यासमोर घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, हा प्रकार घडल्याने प्रकाश यांनी उपराज्यपाल बैजल यांची निवासस्थानी जावून भेट घेतली व घडलेला प्रकार त्यांच्या कानी घातला. दरम्यान, या घटनेनंतर प्रशासकीय अधिकारी संघटनेने तत्काळ बैठक बोलावली असून त्यानंतर पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ॲट्रॉसिटी ॲक्टला कमकुवत करणाऱ्या परिपत्रकाची अंमलबजावणी होणार नाही! – सिद्धार्थ हत्तिअंबिरे

Aprna

संपूर्ण प्रशासनाचीच ‘वळसे-पाटील’ पॅटर्नने झाडाझडती होणे गरजेचे!

News Desk

महाविकास आघाडीतील ८ आमदार नाराज, मुंबईत राजकीय हालचालींना सुरूवात

News Desk