HW News Marathi
महाराष्ट्र

#coronavirus : राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १६७ वर पोहोचली

मुंबई | देशभरात कोरोनाचा प्रादुर्भावर दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत ७ आणि नागपूरमध्ये १ अशा ८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज (२८ मार्च) कोरोनाग्रस्तांची संख्या १६७ वर गेला आहे. तर देशात कोरोनाबाधितांची संख्या ९३५ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात १४९ नवे रूग्ण आढळले असून आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या सर्वात जास्त केरळमध्ये आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून आज लॉकडाऊनचा चौथा दिवस आहे. देशात सर्वाधिक पाच मृत्यू महाराष्ट्रात झाले असून गुजरात ३ तर कर्नाटकमध्ये २ बळी गेले आहेत. याशिवाय दिल्ली, पंजाब, तामिळनाडू, मध्यप्रदेश, जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल, बिहार, हिमाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र कोरोनाबाधितांचा आकडा

  • मुंबई – ६३
  • पुणे – १९
  • पिंपरी-चिंचवड – १३
  • सांगली – २४
  • नागपूर – १२
  • कल्य़ाण-डोंबिवली – ६
  • नवी मुंबई – ६
  • ठाणे – ५
  • यवतमाळ – ४
  • अहमदनगर – ३
  • पनवेल – २
  • सातारा – २
  • उल्हासनगर – १
  • वसई-विरार – १
  • पालघऱ – १
  • सिंधुदुर्ग – १
  • औरंगाबाद – १
  • रत्नागिरी – १
  • कोल्हापूर – १
  • गोंदिया – १

राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या – १६७

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

Aprna

मनसेनेचा दणका! अ‍ॅमेझॉनचं पुण्यातील कार्यालय फोडले

News Desk

चिपळूणमध्ये पुराची पाणीपातळी चार-पाच फुटांनी खाली

News Desk